पीएनबी घोटाळ्यात आणखी 5 जणांना अटक


पीएनबी घोटाळ्यात आणखी 5 जणांना अटक
SHARES

पंजाब नॅशनल बँक(पीएनबी) मध्ये झालेल्या 11400 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी निरव मोदीच्या फायस्टार डायमंड कंपनीच्या वित्त विभागाचा अध्यक्ष विपुल अंबानीला अटक केली. यासोबतच मेहुल चोक्सी याच्या कंपनीतील 4 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सीबीआयने मंगळवारी अटक केली आहे.


या चौघांना अटक

या घोटाळ्यत सुरुवातीपासूनच विपुल अंबानीचं नाव पुढे येत असल्यामुळे सर्वांच्याच नजरा अंबानी कुटुंबियांच्या हालचालीवर होत्या. विपुल हा उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी याचा नातेवाईक आहे. याप्रकरणी विपुलची रविवारपासून चौकशी सुरू होती. मात्र चौकशीत विपुल सीबीआय अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्यामुळे ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळते. विपुलसह सीबीआयने मेहुलच्या कंपनीतील 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अटक केली आहे. यामध्ये नक्षत्र आणि गितांजली ग्रुपचे मुख्य वित्त अधिकारी कपिल खंडेलवाल, व्यवस्थापक नितेश शाही, कविता माणकीकर आणि अर्जुन पाटील यांना मंगळवारी अटक करण्यात आल्याचं सीबीआयने जाहीर केलं आहे.


त्या तिघांना पोलिस कोठडी

या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून मुख्य आरोपी निरव मोदीच्या घरी छापे टाकण्यचे सत्र अजूनही सुरूच आहे. निरवच्या 13 निवासस्थानाच्या झडतीतून ईडीने मंगळवारी 10 कोटीची मालमत्ता हस्तगत केली आहे. यापूर्वी या घोटाळ्यात अटक केलेल्या बँकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 3 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा