२५ वर्षांच्या तरूणाजवळ ५ देशी कट्टे!

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

कुर्ला परिसरात देशी कट्टयाची विक्री करण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय तरूणाला विनोबा भावे पोलिसांनी अटक केली आहे. रामनिवास मिठ्ठूलाल कटारिया असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ५ देशी कट्टे आणि ३ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. या प्रकरणी विनोबा भावे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

कुर्ल्याच्या एचडीआयएल परिसरात अज्ञात व्यक्ती देशी कट्याच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विनोबा भावे पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला होता.

हत्यारे कशासाठी?

पोलिसांनी सापळा रचलेल्या ठिकाणी रामनिवास संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता पोलिसांना त्याच्याजवळ ५ देशी कट्टे आणि ३ जिवंत काडतुसे मिळाली. ही हत्यारे त्याने विक्रीसाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिली. रामनिवासने ही हत्यारे कुठून आणली? त्याचा पोलिस शोध घेत असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


हेही वाचा-

गरजा भागवण्यासाठी तरुणांना लाखोंचा गंडा

मुंबई विमानतळावर अडीच कोटींचं गोल्डबार जप्त, आरोपी फरार


पुढील बातमी
इतर बातम्या