मुंबई विमानतळावर अडीच कोटींचं गोल्डबार जप्त, आरोपी फरार


मुंबई विमानतळावर अडीच कोटींचं गोल्डबार जप्त, आरोपी फरार
SHARES

दुबईतून छुप्या पद्धतीनं लपवून आणलेलं कोट्यवधी रुपयांचं सोनं हवाई गुप्तचर विभागाने छत्रपती शिवाजी टर्मिनल विमानतळावर पकडलं. पण आरोपी गुप्तचर विभागाच्या हाती लागला नाही. कारवाईच्या भीतीने त्याने पळ काढला असल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.


गुप्तचर विभागाने केली कारवाई

मुंबई विमानतळावर जेट एअरवेजच्या एका प्रवाशाच्या सीटमध्ये कोट्यवधी रुपयांचं सोनं असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार या सोनं तस्करीचा माग काढण्यासाठी गुप्तचर विभागाचे अधिकारी विमानात पोहचले. त्यावेळी सीटमध्ये एक किलो आणि अडिच किलो वजनाच्या १२ गोल्डबार लपवण्यात आल्या होत्या. या गोल्डबारची किंमत २ कोटी ६० लाख रुपये आहे. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध घेत आहेत. यासाठी विमानातील प्रवाशांचे बुकिंग, सीसीटिव्ही कॅमेरे तपासण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा