दारू पिऊन मारझोड करणाऱ्या पतीलाच संपवलं

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • क्राइम

दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्याला पतीची पत्नीनेच हत्या केल्याची घटना परळमध्ये घडली. सरीता (४३) या महिलेने पती अर्जुन बलिराम पासी याला क्रिकेटच्या स्टंपने बेदम मारहाण केली. जखमी अर्जुनचा यामध्येच मृत्यू झाला. अर्जुन सरिता अाणि मुलांना वारंवार मारहाण करायचा. या मारहाणीलाच कंटाळून सरिताने हे पाऊल उचललं. काळाचौकी पोलिसांना सरिताला अटक केली असून तिला न्यायालयात हजर केलं अाहे.

नेमकं काय झालं? 

सोमवारी १८ जूनला सरिता पती अर्जून याला बेशुद्ध अवस्थेत परळमधील केईएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांनी अर्जुनचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी चौकशी केली असता, अर्जुन नेहमी दारू पिऊन अापल्याला अाणि मुलांना मारहाण करायचा. 

त्या दिवशीही अर्जुन भरपूर दारू पिला होता, असं सरिताने पोलिसांना सांगितलं. मात्र, अर्जुनच्या मृत्यूनंतरही सरिताच्या चेहऱ्यावर दुखः दिसलं नाही. त्यामुळे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगले यांनी अर्जुन राहत असलेल्या परळमधील राजकमल स्टुडीओजवळील कात्री देवी एसआरए सोसायटीत शेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी केली.

त्यावेळी दारूच्या नशेमध्ये तो सतत सरिताला अाणि मुलांना शिवीगाळ तसंच मारहाण करायचा. १८ जूनलाही त्यांच्यात वाद झाले होते, असं पोलिसांना समजलं. सरिताची सखोल चौकशी केली असता तिने अर्जुनला क्रिकेटच्या स्टंपने मारल्याचे अाणि यामध्ये अर्जुनचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मागील ४ वर्षांपासून त्यांच्यामध्ये फक्त नावालाच पती-पत्नीचं नातं होतं असंही तिने पोलिसांना सांगितलं. 


हेही वाचा - 

'तिने' ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबलं, ९ जणांना उडवलं

'ते' परदेशी नागरिकांचं डेबिट, क्रेडिट कार्ड चोरायचे, पोलिसांनी केलं गजाअाड


पुढील बातमी
इतर बातम्या