रॅगिंगला कंटाळून डॉक्टर तरुणीची आत्महत्या

महापालिकेच्या नायर रुग्णालयात सराव करणाऱ्या डॉक्टर पायल तलवी या २३ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सोबत शिकत असलेल्या सहकाऱ्यांकडून वेळोवेळी घालून पाडून बोलल्यामुळं मानसिक तणावातून पायलनं हे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

जातीय वाचक चेष्ठा

स्त्री रोग विभागाच्या दुसऱ्या वर्षात पायल शिकत होती. मागील अनेक दिवसांपासून तिला तिचे काही सहकारी जातीय वाचक चेष्ठा करत होते. दररोज होणाऱ्या या त्रासामुळे पायल मानसिक तणावाखाली गेली होती. येता-जाता तेच विचार तिच्या डोक्यात चालू असल्यानं अभ्यासात ही लक्ष लागत नव्हतं. याच नैराक्षेतून पायलनं आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.

पंख्याला गळफास आत्महत्या

गुरूवारी सायंकाळी पायल वसाहती गृहात आल्यानंतर तिनं खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पायलनं आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पायलचा मृतदेह त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवत पायलच्या आत्महत्येस कारणीभूत म्हणून ३ महिला डॉक्टरांना अटक केली आहे. हेमा आहुजा, अंकिता खंडेलवाल, आणि भक्ती अशी या डॉक्टराची नावं आहेत. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहे.


हेह वाचा -

भन्साळींसाठी समीर पुन्हा बनला राजकारणी

EXCLUSIVE : प्रियाला पुन्हा लागले रंगभूमीचे वेध


पुढील बातमी
इतर बातम्या