Advertisement

भन्साळींसाठी समीर पुन्हा बनला राजकारणी

हिंदी चित्रपटसृष्टीत नायक बनून एंट्री मारणारा मराठमोळा समीर धर्माधिकारी आजवर सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर आला आहे. सध्या चर्चेत असलेल्या संजय लीला भन्साळींच्या 'मलाल' या चित्रपटसाठी तो पुन्हा एकदा राजकारणी बनला आहे.

भन्साळींसाठी समीर पुन्हा बनला राजकारणी
SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीत नायक बनून एंट्री मारणारा मराठमोळा समीर धर्माधिकारी आजवर सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर आला आहे. सध्या चर्चेत असलेल्या संजय लीला भन्साळींच्या 'मलाल' या चित्रपटसाठी तो पुन्हा एकदा राजकारणी बनला आहे.


भन्साळींची निर्मिती

'मलाल' हा चित्रपट खऱ्या अर्थानं दोन कारणांमुळं फार चर्चेत आहे. एक म्हणजे हा भन्साळींची निर्मिती असलेला चित्रपट असल्यानं आणि दुसरं म्हणजे या चित्रपटाद्वारे जावेद जाफरींचा मुलगा मीझान आणि भन्साळींची भाची शर्मिन सैगल चित्रपटसृष्टीत दाखल होणार असल्यानं. अभिनयासाठी राष्ट्रीय पारितोषिक पटकावणाऱ्या 'टिंग्या' फेम दिग्दर्शक मंगेश हाडवळेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. असं असलं तरी भन्साळींचं व्हीजन नक्कीच 'मलाल'ला एका वेगळ्याच उंचीवर नेईल अशी आशा आहे. अशी मोठमोठी नावं जोडल्या गेलेल्या चित्रपटात समीरनं राजकारण्याची भूमिका साकारली आहे.


राजकारण्याची भूमिका

एखाद्या चांगल्या किंवा वाईट राजकारण्याची भूमिका साकारणं हे समीरसाठी नवं नाही. यापूर्वी 'सिंघम रिटर्न'मध्ये त्यानं साकारलेला व्हाईट कॅालर राजकारणी सर्वांना पसंत पडला होता. याउलट 'फर्जंद' या मराठी चित्रपटात समीरनं रंगवलेला बेशकखान अतिशय क्रूर आणि दुष्ट होता. दोन परस्परविरोधी भूमिकांमध्येही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरणाऱ्या समीरनं 'मलाल'च्या निमित्तानं भन्साळींच्या टीममध्ये एंट्री केली आहे. भन्साळींसोबतच समीर याचं क्रेडीट मंगेशलाही देतो.


दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट 

मंगेशचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट असलेल्या 'मलाल'मध्ये समीरनं नेमका कशा प्रकारचा राजकारणी साकारला आहे याबाबत सध्या तरी काहीच सांगण्यात येत नाही. चित्रपटात तीनच प्रमुख व्यक्तीरेखा असल्यानं 'मलाल'मध्ये समीर खलनायक बनून नायकासमोर कडवं आव्हान उभं करणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या चित्रपटाची पटकथा मंगेशनं भन्साळी आणि संजीव यांच्या साथीनं लिहीली आहे. हा चित्रपट '७जी रेन्बो कॅालनी' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. भन्साळींसह श्रेयस पुराणीक आणि शाली हांडा यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.



हेही वाचा -

मनसेचे उमेदवार असते तर चित्र वेगळं असतं - शरद पवार

मुंबईतील सर्व जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा