उद्धव ठाकरेंची बदनामी करणाऱ्यास नागपूरमधून अटक

महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोशल मिडियावर अनेकदा बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उद्धव ठाकरेंची अशीच बदनामी करणाऱ्या एका तरुणास नागपूरहून सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सुमित ठक्कर असे या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचाः-भाजपला मोठा झटका! खडसेनंतर या 'बंडखोर' आमदाराने ठोकला रामराम

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियावर बदनामी सुरु केली होती. याप्रकरणी युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १ ऑक्टोबर २०२० रोजी हायकोर्टाने समित याला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर समित ५ ऑक्टोबर रोजी वी. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. मात्र, काही वेळातच तो बाथरुमला जातो असे सांगून पळून गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचाः-मुंबईत वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण, संजय राऊतांची कारवाई करण्याची मागणी

समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. तसेच तो गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अपमानित करणारा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करत होता. त्यावेळी धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यावर समित हा पोलिसांना हाती लागत नव्हता. दरम्यान, कोर्टाने आरोपी समित याला वी. पी. रोड पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशन येथे जाऊन तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्याचा लॅपटॉप आणि मोबाईलदेखील पोलिसांच्या ताब्यात सांगितले होते. त्यानंतर समित ५ ऑक्टोबर रोजी वी. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. मात्र, काही वेळातच बाथरुमला जातो असे सांगून त्याने तिथून पळ काढला. मात्र, आज अखेर त्याला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या