अकरावी प्रवेशासाठी अडीच लाख अर्ज

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातून २ लाख ३१ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला अाहे. तर अकरावीसाठी २ लाख ९८ हजार ४०५ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदा कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही.

५ जुलैला पहिली यादी

प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादी २९ जून रोजी जाहीर करण्यात येणार अाहे.  या यादीद्वारे विद्यार्थ्यांना एकूण क्रमवारीत त्यांचं स्थान समजू शकणार आहे. तसंच त्यांनी भरलेल्या अर्जाचा तपशीलही त्यांना पाहता येणार आहे. यामध्ये काही त्रुटी असल्यास दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना ३ जुलै रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाद मागता येणार आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर होणार आहे.


हेही वाचा -

बीएससी-आयटीचा निकाल जाहीर

जात वैधता प्रमाणपत्राशिवाय होणार प्रवेश प्रक्रिया


 

पुढील बातमी
इतर बातम्या