पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी अवघे २४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (८ डिसेंबर) २४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच कळंबोली येथील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २, नवीन पनवेल २,  खांदा काॅलनी ३, कामोठे ३, खारघर येथील १४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १०, नवीन पनवेल ७, कळंबोली १३, कामोठे १०, खारघर येथील १७ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २५९१६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २४८६६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४६७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, परिस्थितीही नियंत्रणात

कांदिवलीत बारवर कारवाई, आॅर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांकडून अश्लील कृत्य


पुढील बातमी
इतर बातम्या