कांदिवलीत बारवर कारवाई, आॅर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांकडून अश्लील कृत्य


कांदिवलीत बारवर कारवाई, आॅर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांकडून अश्लील कृत्य
SHARES

कांदिवलीच्या समतानगर परिसरातील आँर्केस्ट्राबार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित बार अँण्ड रेस्टोरंन्टवर रविवारी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी १ बार मॅनेजर, कॅशिअर, ९ वेटर आणि ३१ ग्राहकांवर कारवाई केली. तर १९ बारबालांना मुक्त केले. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- भारत बंद: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत

कांदीवलीच्या समतानगर परिसरात आँर्केस्ट्राच्या नावाखाली बारमध्ये महिलाशी अश्लील कृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रविवारी सायंकाळी अचानक बारवर कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांना ग्राहक हे नृत्य करत असलेल्या महिलांना अश्लील नृत्य करण्यास प्रोत्साहित करत होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बार अस्थापनांना ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहक आणि सुरक्षित अंतर ठेण्याचे नियम घालून दिले असताना. नियम पायदळी तुडवत बारमध्ये अपेक्षा पेक्षा जास्त जास्त गर्दी असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले.

हेही वाचाः- भारत बंद! मुंबईत बेस्ट, टॅक्सी सुरू राहणार

या प्रकरणी बार मालकासह कॅशिअर, वेटर आणि ३१ ग्राहकांवर समतानगर पोलिस ठाण्यात १८८, २६९, २९४, ११४, ३४ भा.द.वि कलमांतरर्गत गुन्हा नोंदवण्यता आला आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५१(ब), महाराष्ट्र  हाँटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष (बार रुम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंधक घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ कलम ३,८(१),(२) नुसार गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिस अधिक तपास करत आहे.   

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा