Advertisement

भारत बंद: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत

‘भारत बंद’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची दूध कोंडी होण्याची शक्यता आहे.

भारत बंद: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत
SHARES

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची दूध कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण, मंगळवारी दुपारनंतर मुंबईत दुधाचे टँकर्स येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समजताच आता नागरिकांनी दूध खरेदीसाठी गर्दी केली आहे.

मुंबईतील कुर्ला दूध डेअरीच्या परिसरात दूधाच्या गाड्या पोहोचल्या. यानंतर दुग्ध वितरण संघाकडून दुपारनंतर मुंबईत दूध पाठवले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांनी आत्ताच दूध विकत घ्यावे, असे आवाहन राजाराम बापू पाटील सहकारी दूध लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. परिणामी सामान्य ग्राहक दुधाच्या खरेदीसाठी डेअरी आणि दुकानांवर गर्दी करताना दिसत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा