Advertisement

भारत बंद! मुंबईत बेस्ट, टॅक्सी सुरू राहणार

भारत बंदमध्ये बेस्ट बसेस सहभागी होणार नाहीत. या बसेस भारत बंदचा भाग असणार नाहीत, अशी माहिती बेस्टच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.

भारत बंद! मुंबईत बेस्ट, टॅक्सी सुरू राहणार
(File Image)
SHARES
नव्या कृषी कायद्याविरोधात  देशभरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी एकदिवसीय भारत बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या या 'भारत बंद'ला आतापर्यंत अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र मंगळवारी मुंबईतील बेस्ट बसेस आणि टॅक्सी सुरू राहणार आहेत.

भारत बंदमध्ये बेस्ट बसेस सहभागी होणार नाहीत. या बसेस भारत बंदचा भाग असणार नाहीत, अशी माहिती बेस्टच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली. बसेच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहेत. बसच्या खिडक्यांवर लोखंडी जाळ्या आणि इतर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल असेही बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. 

तसंच टॅक्सी देखील रस्त्यावर नियमित धावतील असे टॅक्सी युनियनने स्पष्ट केलं आहे.  मुबंईतील टॅक्सी सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय टॅक्सी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतल्या बस आणि टॅक्सीवर याचा परिणाम जाणवणार नाही.हेही वाचा -

११ वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर

मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा