Advertisement

मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं

मुंबईत पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं
SHARES

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई शहरात सतत जलवाहिनी फुटत असून, पाणीपुरवठा खंडित केला जात आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. कारण, मुंबई महापालिकेनं ९ व १० डिसेंबर रोजी सुमारे ४ किलोमीटर लांबीची व १,८०० मिलीमीटर व्यासाची ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेतले आहे. त्यामुळं पालिकेच्या एस विभागात काही परिसरांमध्ये ९ व १० डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहील, तर काही विभागांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.

९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत डक लाइन, राजाराम वाडी, श्रीराम पाडा, खिंडीपाडा, टेंभीपाडा, सोनापूर, तुलशेतपाडा, प्रतापनगर, जमिलनगर, समर्थनगर, सुभाषनगर, द्राक्षबाग, उत्कर्षनगर, राजदीपनगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, जयभीमनगर, बेस्टनगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा, आंब्याची भरणी, रावते कंपाउंड, रामनगर, पासपोली गाव, मोरारजीनगर, गावदेवी टेकडी, सर्वोदयनगर या परिसरांत पाणी येणार नाही.

९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. १ व २, हनुमाननगर, मोटानगर, शिवाजीनगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरानगर, मापखाननगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांतिनगर, कबीरनगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी अँड टी वसाहत, ओमनगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक परिसर), सहार गाव, सुतार पाखाडी, विजयनगर मरोळ परिसर, सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात कमी दाबानं पाणी येणार आहे.

९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन परिसरात कमी दाबानं पाणी येणार आहे. तसंच, ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत कुर्ला उत्तर परिसर, बरेली मशीद, ९० फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकरनगर, महात्मा फुलेनगर, तानाजीनगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गालगतचा परिसर, सत्य नगर पाइपलाइन इथं कमी दाबानं पाणी येणार आहे.

धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग, प्रेमनगर, नाईकनगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग इथं कमी दाबानं पाणी येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा