मुंबई विद्यापीठाचा स्लॅब कोसळला, ३ विद्यार्थीनी जखमी

मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधील रानडे भवन या इमारतीच्या स्लॅब सोमवारी अचानक कोसळला. यामुळं ३ विद्यार्थीनी जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यातील एका विद्यार्थीनीची प्रकृती नाजूक असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

कशी झाली दुखापत?

रानडे भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील काही भाग दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोसळला. त्यावेळी स्नेहल तरे, पुजा सोनावणे, आणि मोनिका मोरे या तिघीजणी इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसल्या होत्या. त्याचवेळी अचानक इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं स्नेहलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसंच पुजाच्या हाताला तर मोनिकाच्या पाठीला व हाताला इजा झाली. या तिघीही एम.ए च्या फर्स्ट इयरला आहेत.

कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या इमारतींच काम निकृष्ट दर्जाचं असून या सर्व इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तत्कालीन विकासक आणि आर्किटेक्ट यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. तसंच येत्या मॅनेजमेंट काऊन्सिलच्या मिटींगमध्ये याबाबत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यात येईल

– शीतल शेठ, सिनेट सदस्या


हेही वाचा-

पास होऊन वर्ष उलटलं, तरी निकालाची प्रत मिळेना

फ्लॅशबॅक २०१८- विद्यापीठाचं गतवैभव परत मिळणार का?


पुढील बातमी
इतर बातम्या