Advertisement

पास होऊन वर्ष उलटलं, तरी निकालाची प्रत मिळेना

मृण्मयी नागपूरला राहत असून निकालासाठी दर महिन्याला निकालाची प्रत मिळवण्यासाठी विद्यापीठात खेपा घालाव्या लागत आहेत. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळं तिला बार काऊन्सिलच्या परीक्षेला मुकावं लागणार आहे.

पास होऊन वर्ष उलटलं, तरी निकालाची प्रत मिळेना
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळं चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार थांबताना दिसत नाहीय. मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला पास होऊन वर्ष झाल्यानंतरही अद्याप निकालाची प्रत मिळाली नसल्याचं समोर आलं आहे. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळं या विद्यार्थिनीला बार काऊन्सिलच्या परीक्षेला मुकावं लागणार आहे.


कधी दिली होती परीक्षा?

लॉ (विधी) शाखेच्या ५ वर्षीय बॅचलर ऑफ लिगल सायन्स आणि बॅचलर ऑफ लॉ (L.L.B/B.L.S) मध्ये शिकणाऱ्या मृण्मयी अनिल कोटपल्लीवार हिने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात सेमिस्टर ९ व १० ची परीक्षा दिली होती. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या सेमिस्टर ९ च्या परीक्षेत मृण्मयी एका विषयात नापास झाली होती. परंतु एकाच विषयात नापास असल्यानं तिनं उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी टाकण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पुनर्मूल्यांकनाचे निकाल उशीरा लागत असल्यानं तिनं खबरदारी म्हणून पुनर्परीक्षेसाठीही अर्ज केला होता. परंतु पुनर्मूल्यांकनात ती पास झाल्याचं तिला समजलं.


निकाल आरक्षित

त्यानंतर तिनं निर्धास्त होऊन दहाव्या सेमिस्टरची परीक्षा दिली व त्यात ती चांगल्या गुणांनी पास झाली. परंतु विद्यापीठानं जाहीर केलेल्या निकालादरम्यानं तिला सेमिस्टर ९ मध्ये नापास दाखवण्यात आलं. विशेष म्हणजे तिचा निकाल आरक्षित (RR) वर्गात ठेवण्यात आल्याचं तिला लक्षात आलं.


परीक्षेला मुकावं लागणार?

मृण्मयीनं याबाबत २६ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई विद्यापीठाला पत्र लिहित घडलेला सर्व प्रकार सांगितला. विशेष म्हणजे या पत्रासोबत तिनं तिच्या सेमिस्टर नऊच्या निकालाची प्रतही जोडली. परंतु ३ महिने उलटून गेले तरी विद्यापीठाकडून तिला तिचा निकालाची प्रत मिळालेली नाही. विशेष म्हणजे मृण्मयी नागपूरला राहत असून निकालासाठी दर महिन्याला विद्यापीठात खेपा घालाव्या लागत आहेत. आणि विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळं तिला बार काऊन्सिलच्या परीक्षेला मुकावं लागणार आहे.

या संपूर्ण प्रकारामध्ये विद्यार्थिनीची कोणतीही चूक नसून केवळ विद्यापीठ प्रशासनाच्या भोगंळ कारभाराचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसत आहे. सेमिस्टर नऊमध्ये पास होऊन तिचा पूनर्मूल्यांकनाचा निकाल विद्यापीठानं दिला आणि त्यानंतर दहाव्या सेमिस्टरमध्ये तिला नापास दाखवून तिचा निकालाची प्रत आरक्षित ठेवण्यात आली. यातून विद्यापीठ प्रशासनाचा पुनर्मूल्यांकन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा अपडेट करते का? यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ काऊन्सिल



हेही वाचा-

'एमपीएससी'च्या पद संख्येत वाढ, १७ फेब्रुवारीला परीक्षा

पुनर्मुल्यांकनात पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावं पदवीदान सभारंभात गायब



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा