Advertisement

पुनर्मुल्यांकनात पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावं पदवीदान सभारंभात गायब


पुनर्मुल्यांकनात पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावं पदवीदान सभारंभात गायब
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणामुळे चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या यंदाच्या पदवीदान सभारंभात पुनर्मुल्यांकनात पास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांची नावचं नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत स्टुडंट लॉ काऊन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी कुलगुरू सुहास पेडणेकर यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.


नेमकं प्रकरण काय?

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येत्या ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सभारंभात अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र प्राप्त होतात. यंदाच्या या सभारंभात पदवी प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी २५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी नावं तपासली. परंतु यात पुनर्मुल्याकनात पास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांची नावंच नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. यामुळं विद्यापीठाचा पदवीदान सभारंभ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पदवी प्रमाणपत्र न मिळाल्यानं उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे. 


मे महिन्यात पदवी

याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात धाव घेतली असता त्यांना विद्यापीठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्षात पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावंच या यादीत दिली जातात. जे विद्यार्थी नापास होतात त्यांचं नाव केटीच्या यादीत टाकलं जातं. यातील काही विद्यार्थी पुनर्मुल्याकनानंतर पास होतात. त्यांना मे महिन्यात पदवी प्रमाणपत्र दिलं जातं, असं सांगण्यात आलं. 


अपडेट करावी

स्टुडंट लॉ काऊन्सिलने याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई विद्यापीठानं पदवी प्रमाणपत्राची यादी वेळोवेळी अपडेट करावी. जेणेकरून कोणतीही समस्या येणार नाही असं मत स्टुडंट लॉ काऊन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केलं आहे.


मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभारंभातील पदवी प्रमाणपत्राची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. मात्र त्यात माझं नाव नसल्यानं मी आश्चर्यचकित झालो. पदवी परीक्षेवेळी काही विषयात मी नापास झालो असलो, तरी त्यानंतर मी ते पेपर पुनर्मुल्याकनांसाठी दिल्यानंतर मी पास झालो.  यात संपूर्णत: विद्यापीठाची चूक असून मला त्याची झळ सोसावी लागत होती.

 - सर्जेराव पाटील, विद्यार्थी, लॉ 



हेही वाचा - 

आता काॅलेजच घेणार फर्स्ट, सेकंड इयरच्या परीक्षा

उद्यापासून आयआयटीत रंगणार मूड इंडिगो




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा