आता काॅलेजच घेणार फर्स्ट, सेकंड इयरच्या परीक्षा

गेल्या २ वर्षांपासून या परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येत होत्या. त्या अनुषंगाने या परीक्षांचं वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत निश्चित करण्यात येत होतं. परंतु विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना फटका बसत होता. त्यामुळे या परीक्षांच्या कामासाठी कॉलेजातील मनुष्यबळ उपलब्ध व्हावं म्हणून कॉलेज प्रतिनिधींनी प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा जुन्याच पद्धतीने काॅलेजांमार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यापीठाकडे केली होती.

SHARE

चालू २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा कॉलेजांमार्फत घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील ठराव नुकताच विद्या परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी तसंच परीक्षांचा दर्जा उंचावण्यासाठी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली ४ विद्याशाखेतील अधिष्ठातांची मिळून एक समिती देखील गठीत करण्यात येणार आहे.


काॅलेजांची मागणी

गेल्या २ वर्षांपासून या परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येत होत्या. त्या अनुषंगाने या परीक्षांचं वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत निश्चित करण्यात येत होतं. परंतु विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना फटका बसत होता. एकाबाजूला विद्यापीठाच्या लांबलेल्या वेळापत्रकामुळं शैक्षणिक सत्र अपूर्ण राहात होतं. तर दुसऱ्या बाजूला विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या मूल्यांकनही रखडत होतं. त्यामुळे या परीक्षांच्या कामासाठी कॉलेजातील मनुष्यबळ उपलब्ध व्हावं म्हणून कॉलेज प्रतिनिधींनी प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा जुन्याच पद्धतीने काॅलेजांमार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यापीठाकडे केली होती.


काॅलेजांकडून सूचना

या मागणीनुसार विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमली होती. या समितीनं परीक्षांचं वेळापत्रक, प्रश्नपत्रिका, उत्तरपुस्तिकांचं मूल्यांकन या विविध बाबींसाठी कॉलेजांकडून अभिप्राय आणि सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार काॅलेजांकडून आलेल्या शिफारशींनुसार विद्यापीठाच्या विद्या परिषदेने सविस्तर चर्चेनंतर एकमताने प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा कॉलेजामार्फत घेण्याचा ठराव मंजूर केला.


काॅलेजांवर समिती ठेवणार नजर

परंतु या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी तसंच कामात सुसूत्रता आणण्यासाठी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली चार विद्याशाखांतील अधिष्ठाताच्या समितीची नेमणूक केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने कॉलेजमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो किंवा नाही, अध्ययन-अध्यापनाचा १८० दिवसांचा कार्यकाळ पाळला जातो का, कॉलेजामार्फत तयार करण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा कायम राखण्यात येतो का, पेपर सेटींग व्यवस्थित करण्यात येत का, वेळापत्रकात समानता येते का, उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचा दर्जा कायम राखता येतो का? यांसह विविध बाबी तपासण्यात येणार आहे.हेही वाचा-

विद्यापीठाच्या पुस्तकांवर कुलगुरू म्हणून संजय देशमुख याचंच नाव

अखेरीस विद्यापीठात सीसीटीव्ही लागलेसंबंधित विषय
ताज्या बातम्या