Advertisement

अखेरीस विद्यापीठात सीसीटीव्ही लागले


अखेरीस विद्यापीठात सीसीटीव्ही लागले
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये काही महिन्यांपूर्वी एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणानंतर विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी ३०० सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत कोणतीही हालचाल होतं नसल्याचं दिसून येत होतं. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी विद्यापीठात काही महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. 


आक्रमक पवित्रा

कलिना कॅम्पसमधील रानडे भवनात ४ ऑगस्टला एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. या प्रकरणानंतर विद्यापीठातील रानडे भवन, परीक्षा केंद्र, आयडॉल, महिला प्रसाधनगृह यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचंही स्पष्ट झालं होतं. यावर अनेक विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण करत विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली होती. 


पोलिस चौकीची घोषणा

या भेटीनंतर लगेचच कलिना कॅम्पसमध्ये विविध ठिकाणी ३०० सीसीटीव्ही व दोन पोलिस चौकी उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी तत्वता मान्यता देण्यात आली होती. परंतु चार महिने उलटल्यानंतरही विद्यापीठ प्रशासन याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हतं. यावर युवासेनेच्या सिनेट सदस्यांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. 


१० कोटी खर्च

५ डिसेंबर रोजी विद्यापीठ प्रशासन व युवासेनेसोबत झालेल्या बैठकीनंतर विद्यापीठातील सीसीटीव्ही लावण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं वेग आला. सिनेट सदस्या सुप्रिया कारांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील मुख्य गेट आणि इतर इमारतीच्या गेटजवळ व  कलिना कॅम्पसमधील परिसर या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. इतर ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच काम सुरू असून यासाठी एकूण १० कोटी रूपये खर्च आला आहे. सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून काही दिवसात मुंबई विद्यापीठ नक्कीच सुरक्षित होईल, असा विश्वास सुप्रिया कारांडे यांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा - 

विद्यापीठाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, इंटरकॉम सेवा आठ महिने बंद

अर्धे वर्ष उलटलं तरी अायडॉलचे विद्यार्थी पुस्तकाविना
संबंधित विषय