Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

विद्यापीठाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, इंटरकॉम सेवा आठ महिने बंद

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अनेक इमारती अाहेत. या इमारतीमधील दूरध्वनी सेवेअंतर्गत ६०० इंटरकॉम कनेक्शन आहेत. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून ही सेवा पूर्णपणं बंद अाहे.

विद्यापीठाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, इंटरकॉम सेवा आठ महिने बंद
SHARES

विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठातील इंटरकॉम सेवा गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्याचं उघडकीस आलं आहे. याआधी शुक्रवारी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील ग्रीन टेक्नोलॉजीच्या इमारतीत उत्तरपत्रिका स्कॅनिंगदरम्यान आग लागल्याची घटना घडली होती. यामुळं विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 


मशीन, कार्ड रॅक भंगारात 

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अनेक इमारती अाहेत. या इमारतीमधील दूरध्वनी सेवेअंतर्गत ६०० इंटरकॉम कनेक्शन आहेत. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून ही सेवा पूर्णपणं बंद अाहे. एमटीएनएलची ईपीबीएक्स(EPBX) मशीन व त्यासाठी लागणारे कार्ड रॅक भंगारात पडले आहेत. यामुळं विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये संवाद होण्यास अडथळे येत असून कामातही दिरंगाई होत अाहे. 


करार संपला

विशेष म्हणजे गेल्या कित्येक महिन्यांपासून कलिना कॅम्पसमधील काही जागा एमटीएनएलला नाममात्र दरानं जनरेटर व साधन साम्रगी ठेवण्यास दिली जात अाहे. या ठिकाणाहून वांद्रे व कुर्ला परिसरात दूरध्वनी व इंटरनेट सेवेचा पुरवठा केला जात आहे.  या जागेचा करार संपलेला असून प्रशासन एमटीएनएलवर एवढं मेहरबान का असा सवाल युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला विचारला आहे. 


सिनेट सदस्यांची पाहणी

आठ महिन्यांपासून बंद असलेली इंटरकॉम सेवा पूर्ववत होण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही. त्यामुळं शुक्रवारी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर यांनी विद्यापीठाच्या इमारतीची व वेगवेगळ्या विभागात बंद असलेल्या इंटरकॉम सेवेची पाहणी केली व विद्यापीठातील दूरध्वनी व ६०० इंटरकॉम सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे.हेही वाचा - 

अर्धे वर्ष उलटलं तरी अायडॉलचे विद्यार्थी पुस्तकाविना

उत्तरपत्रिकांची सुरक्षा वाऱ्यावर, कलिना कॅम्पसमध्ये उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगवेळी आग
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा