Advertisement

विद्यापीठाच्या पुस्तकांवर कुलगुरू म्हणून संजय देशमुखचं

एमकॉम, बीकॉम, बीए, एमएस्सी, बीएस्सी या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांवर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. संजय देशमुख यांचं नाव आहे. यावरून मुंबई विद्यापीठाला आठ महिन्यांपूर्वी कुलगुरूपदी नियुक्ती झालेल्या डॉ. सुहास पेडणेकर यांच्या नावाचा विसर पडल्याचं चित्र दिसत आहे.

विद्यापीठाच्या पुस्तकांवर कुलगुरू म्हणून संजय देशमुखचं
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळं चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबई विद्यापीठात नव्या कुलगुरूंची नियुक्ती होऊन आठ महिने उलटले अाहे. मात्र, अद्याप विद्यापीठाच्या पुस्तकांवर कुलगुरू म्हणून डॉ. संजय देशमुख यांचं नाव दिसून येत आहे.


पेडणेकरांचा विसर 

दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुंबईसह देश-विदेशातील तरूण विद्यार्थी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतात. यातील अनेक विद्यार्थी विद्यापीठाचे ग्रंथालय व वेबसाईटवरून पुस्तकं डाऊनलोड करून अभ्यास करतात. मात्र एमकॉम, बीकॉम, बीए, एमएस्सी, बीएस्सी या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांवर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. संजय देशमुख यांचं नाव आहे. यावरून मुंबई विद्यापीठाला आठ महिन्यांपूर्वी कुलगुरूपदी नियुक्ती झालेल्या डॉ. सुहास पेडणेकर यांच्या नावाचा विसर पडल्याचं चित्र दिसत आहे. 


अभ्यासक्रम बदलला

२०१५ साली मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. संजय देशमुख यांच्या कार्यकाळात एमकॉम, बीकॉम, बीए, एमएस्सी, बीएस्सीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. त्यानंतर २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात परीक्षा विभागातील गोंधळ, रखडलेले निकाल आणि इतर गैरकारभारामुळं २४ ऑक्टोबर २०१७ साली संजय देशमुख यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार देण्यात आला.


विद्यार्थ्यांचा आक्षेप

डॉ. देवानंद शिंदे यांनी कुलगुरू पदाचा जवळपास पाच महिने कार्यभार सांभाळल्यानंतर २७ एप्रिल २०१८ रोजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रो. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर विद्यापीठाच्या वेबसाईटवर किंवा इतरत्र सर्व ठिकाणी कुलगुरू म्हणून प्रो. सुहास पेडणेकरांचं नाव लावण्यात आलं. मात्र, पुस्तकांवर कुलगुरू म्हणून डॉ. सुहास पेडणेकरांऐवजी, वादग्रस्त कारकिर्द असलेले कुलगुरू डॉ. संजय देशमुख व कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांची नावं दिसत आहे. यावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला असून विद्यार्थी संघटनांनी हे नाव ताबडतोब बदलावं अशी मागणी केली आहे. 


आयडॉलसह गरवारे इन्सिट्यूट व इतर अभ्यासक्रमांच्या पुस्तकांवर कुलगुरू म्हणून संजय देशमुख यांच नाव असल्याचा मुद्दा सिनेट सदस्यांनी काही महिन्यांपूर्वी बैठकीत उपस्थित केला होता. मात्र त्यावेळी पुस्तकांची छपाई लाखोंच्या संख्येने झाली असल्यानं त्यावर नाव बदलणं अशक्य असून इतर ऑनलाईन पीडीएफ स्वरूपातील व ग्रंथालयातील पुस्तकांवर नाव बदलण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ग्रंथालयातील पुस्तकांवर कुलगुरू सुहास पेडणेकर अशा नावाचे स्टिकर्स लावून विद्यार्थ्यांना देण्यात आले.

- सुप्रिया कारंडे, सिनेट सदस्य


कुलगुरू संजय देशमुख यांचं नाव असलेल्या पुस्तकांची छपाई २०१४-१५ साली त्यांच्या कार्यकाळात करण्यात आली आहे. त्यामुळ त्यावर त्यांचं नाव आहे. त्यानंतर हे अभ्यासक्रम बदलण्यात न आल्यानं त्यावर कुलगुरू संजय देशमुख व राजन वेळुकरांची नावे आहेत. परंतु येत्या काही दिवसातच जुन्या पुस्तकांवरील नावं बदलण्यात येणार आहेत. 

- विनोद मळाले, जनसंपर्क अधिकारी, परीक्षा विभाग



हेही वाचा - 

अखेरीस विद्यापीठात सीसीटीव्ही लागले

विद्यापीठाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, इंटरकॉम सेवा आठ महिने बंद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा