Advertisement

उद्यापासून आयआयटीत रंगणार मूड इंडिगो

. यंदाच्या या फेस्टिवलमध्ये ५२ स्पर्धा व २०० हून अधिक इव्हेंट्स होणार अाहेत. या निमित्तानं आपले कलागुण, कौशल्यं जगासमोर मांडण्याची संधी कॉलेज तरूणांना मिळणार असून अाहे.

उद्यापासून आयआयटीत रंगणार मूड इंडिगो
SHARES

विविध संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट संपतो ना संपतो, तेवढ्यातच आयआयटीमध्ये उद्यापासून मूड इंडिगो फेस्टिव्हलची धूम पाहायला मिळणार आहे. आशियातील सगळ्यात मोठा सांस्कृतिक कॉलेज फेस्टिवल अशी ओळख असलेल्या आयआयटी मूड इंडिगो या फेस्टिवलचं यंदा ४८ वं वर्ष आहे. 


५२ स्पर्धा रंगणार 

आयआयटी मूड इंडिगो हा फेस्टिवल यंदा २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान रंगणार असून 'अ माँटेज ऑफ ड्रिम्स' ही यावर्षीची थीम असणार आहे. यंदाच्या या फेस्टिवलमध्ये ५२ स्पर्धा व २०० हून अधिक इव्हेंट्स होणार अाहेत. या निमित्तानं आपले कलागुण, कौशल्यं जगासमोर मांडण्याची संधी कॉलेज तरूणांना मिळणार असून अाहे. संगीत, नाटक, नृत्य, डिझाईन अँड डिजिटल आर्ट, स्पीकिंग आर्ट, फाईन आर्ट, लिटररी इव्हेंट, लाईफ स्टाईल्स आणि जर्नालिझम अँड कम्युनिकेशन अशा नऊ विभागांमध्ये या ५२ स्पर्धा रंगणार आहेत. 

यंदाच्या मूड इंडिगोमध्ये सहभागी होण्यासाठी www.moodi.org या वेबसाइटवर नावनोंदणी सुरू झाली असून या फेस्टिवलला भेट देण्यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. 



हेही वाचा-

CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा