Advertisement

CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीर


CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) तर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१९ दरम्यान घेण्यात येणार असून दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१९ या कालावधीत घेण्यात येणार आहे.


वेबसाईटवर वेळापत्रक

रविवारी संध्याकाळी cbse.nic.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून दहावीच्या विद्यार्थ्यांना ते डाऊनलोडही करता येणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेची सुरुवात गणित विषयाच्या पेपर पासून होणार असून बारावीची परीक्षा कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स यानुसार होणार आहे.


निकाल जूनमध्ये

यंदा सीबीएसईची दोन्ही परीक्षा सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत होणार आहे. या परीक्षेसाठी सकाळी १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना हजर राहावं लागणार आहे. वेगवेगळ्या परीक्षांची तारीख, बोर्ड एकाचवेळी येऊ नयेत याची बोर्डाने विशेष काळजी घेतली असून या परीक्षांचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहेत.



हेही वाचा-

विद्यापीठाच्या पुस्तकांवर कुलगुरू म्हणून संजय देशमुख यांचं नाव

अखेरीस विद्यापीठात सीसीटीव्ही लागले



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा