महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्रसिद्ध केलेल्या पदसंख्येत पुन्हा एकदा वाढ केली असून यंदा ३६० जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. येत्या १७ फेब्रुवारीला होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ४ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहे.
'एमपीएससी'नं दिलेल्या सुधारित जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी पदासाठी ४० जागा, पोलिस उप अधिक्षक/सहायक पोलिस आयुक्त पदासाठी ३१ जागा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा पदासाठी १६ जागा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी २१ जागा, तहसीलदार पदाच्या ७७ जागा, महाराष्ट्र शिक्षण सेवा पदाच्या २५ जागा, कक्ष अधिकारी १६ जागा, सहायक गट विकास ११ जागा, नायब तहसीलदार ११३ जागांसाठी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी 'एमपीएससी'ने ३४२ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पदसंख्येत वाढ करून ३६० पदांसाठी परीक्षा घेणार असल्याचं 'एमपीएससी'ने स्पष्ट केलं. येत्या १७ फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्य़ाच्या ठिकाणी गट 'अ' आणि गट 'ब' पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार असून मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-
पुनर्मुल्यांकनात पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावं पदवीदान सभारंभात गायब
आता काॅलेजच घेणार फर्स्ट, सेकंड इयरच्या परीक्षा