CBSE 10th result: सीबीएसई दहावीचा निकाल २० जुलैला लागणार

इयत्ता १२ वीच्या निकालाचं सूत्र जाहीर करतानाच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीच्या परीक्षांचा निकाल २० जुलै रोजी जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. तर १२ वी परीक्षांचा निकाल ३१ जुलै रोजी जाहीर होईल.

ज्या विद्यार्थ्यांना परेदशात उच्च शिक्षणासाठी जायचं आहे. अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी यायला नकोत, त्यांचं शिक्षण सुरळीपणे सुरू राहावं, या दृष्टीकोनातून आम्ही दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी माहिती CBSE बोर्डाचे संयम भारद्वाज यांनी दिली.

देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन केंद्रानं सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द केली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं केंद्राने परीक्षा रद्द करताना स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा- CBSE १२ वी निकालाचा 'असा' आहे फॉर्म्युला, निकाल ३१ जुलैपर्यंत

पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला तणाव संपुष्टात यायला हवा. तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाऊ नये. सर्व संबंधितांनी या गोष्टीकडे विद्यार्थ्यांसाठी संवेदनशीलतेने पाहायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी- बारावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसंच विद्यार्थी आणि पालक संघटनांनीही परीक्षा घेण्याऐवजी अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करावा, अशी भूमिका घेतली होती. 

त्यानुसार सीबीएसई बोर्डाने बारावीच्या निकालासाठी आवश्यक मूल्यांकनाची पद्धत जाहीर केली आहे. या सूत्रानुसारच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जाईल.

(CBSE 10th result will be declare on 20th july 2021)

हेही वाचा- दहावीचा निकाल जुलैमध्ये लागणार?
पुढील बातमी
इतर बातम्या