Advertisement

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे केली होती.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द
SHARES

केंद्रीय माध्यमीक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या (CBSE board) बारावीच्या परीक्षा (12th exam) रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या  बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 

देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन केंद्रानं सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला तणाव संपुष्टात यायला हवा. तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाऊ नये. सर्व संबंधितांनी या गोष्टीकडे विद्यार्थ्यांसाठी संवेदनशीलतेने पाहायला हवे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसंच विद्यार्थी आणि पालक संघटनांनीही परीक्षा घेण्याऐवजी अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करावा अशी भूमिका घेतली होती. 

परीक्षा होणार नसल्यामुळे आता १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.  त्यासंदर्भात सीबीएसई निश्चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळ ठरवून त्यानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असं सांगण्यात आलं आहे. तसंच गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांना जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अ‌ॅड. ममता शर्मा यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट या संदर्भात गुरुवारी म्हणजे ३ जून रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यासाठी २ दिवसांचा वेळ मागून घेतला होता.  त्यापूर्वीचं  मोदी सरकारनं सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा - 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज

  1. मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा