राज्यातील सर्व CET परीक्षा ऑक्टोबरमध्ये, 'या' तारखेवर होऊ शकते शिक्कामोर्तब

उच्च व तंत्रशिक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएमच-सीईटी) १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान घेण्याचं नियोजन आखत आहे. 

त्यासंदर्भातले सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवावा, अशी माहिती उदय सामंत यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

राज्यपालांसोबत आज (गुरुवारी) सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक आहे. या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या बैठकीत कुलगुरू समितीचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगा (UGC)ला पत्र पाठवून परीक्षेसंदर्भातील राज्याचं नियोजन कळवण्यात येईल, असं सामंत यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात बुधवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. परीक्षा सोप्या घेण्याचा विचार करावा तसंच कुलगुरू समितीचा अहवाल आल्यावर चर्चा करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्यपाल यांनी केल्या.

दरम्यान दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये होते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


हेही वाचा

भूगोलाच्या सर्वेक्षणासाठी १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता मोबाईल अॅप

NEET आणि JEE विद्यार्थ्यांसाठी IIT मुंबईतील विद्यार्थ्यांचा पुढाकार

पुढील बातमी
इतर बातम्या