Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

पदवीच्या परीक्षा घेण्यास राज्यपालही सकारात्मक- उदय सामंत

विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी राज्यपाल देखील सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पदवीच्या परीक्षा घेण्यास राज्यपालही सकारात्मक- उदय सामंत
SHARES

विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी राज्यपाल देखील सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. बुधवार २ सप्टेंबर २०२० रोजी सामंत यांनी राजभवन इथं जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पदवी परीक्षांच्या आयोजनासंबंधीची माहिती त्यांना दिली. त्यानंतर सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (maharashtra higher education minister uday samant meet governor bhagat singh koshyari to discuss on university final year exams)

यावेळी उदय सामंत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिलेल्या निर्णयाचं स्वागत करून त्यानुसार राज्य सरकार या परीक्षांचं नियोजन करणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी)ने पदवी परीक्षा घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. परंतु राज्यातील मुंबई, पुणे सह अनेक विद्यापीठांनी परीक्षा आयोजित करण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. परीक्षांच्या आयोजनासाठी काही विद्यापीठांनी ऑक्टोबर अखेरपर्यंतचा तर काहींनी १० नोव्हेंबरपर्यंतचा वेळ मागितला आहे. विद्यापीठांची अपेक्षा, विद्यार्थ्यांची परीक्षेबाबतची भावना आणि राज्य सरकारची कार्यवाही याबाबतची माहिती राज्यपालांना देण्यात आली. 

हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये, राज्य सरकारने केलं जाहीर

त्यावर विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, अशा सहज, सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार करावा. कुलगुरूंचं म्हणणं जाणून घ्यावं तसंच समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्यपालांनी यावेळी केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४:०० वाजता राज्यपालांच्या उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंची बैठक होईल. या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल आणि त्यानंतर समितीचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतरच पदवी परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने घेण्यात येतील याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यातही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रापर्यंत जावं लागू नये म्हणून घरबसल्याच परीक्षा देण्याची मुभा देखील देण्यात येईल, असं याआधीच उदय सामंत यांनी स्पष्ट केलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा