Advertisement

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना द्यावीच लागणार परीक्षा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

UGC नं दिलेल्या गाईडलाइन्स योग्य असल्यानं अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार मात्र त्या UGCनं दिलेल्या तारखांना घेण्याबाबत प्रत्येक राज्यांना स्वातंत्र आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना द्यावीच लागणार परीक्षा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
SHARES

कोरोना दरम्यान महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या विरोधात दाखल झालेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. कोर्टानं UGC ला मार्गदर्शक तत्त्वे रद्द करण्यास नकार दर्शवला आहे. याशिवाय म्हटलं आहे की, परीक्षा रद्द करण्याचा राज्याचा अधिकार आहे. परंतु परीक्षा दिल्याशिवाय विद्यार्थी पास होणार नाहीत.

न्यायमूर्ती अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. त्यांनी म्हटलं आहे की, ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याची बाब आहे आणि त्याचबरोबर देशात उच्च शिक्षणाची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी आहे.

हेही वाचा : आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मात्र हा निर्णय देताना कोर्टानं राज्यांना थोडा दिलासा दिला आहे. कोर्टानं म्हटलं आहे की, जर त्यांना वाटत असेल की कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ते परीक्षा घेण्यात समर्थ नाहीत तर त्यांना यूजीसीचा सल्ला घ्यावा लागेल. याशिवाय राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परीक्षांवर निर्णय घेऊ शकते. परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन यूजीसीकडून सल्ला घ्यावा लागेलच.

UGC नं दिलेल्या गाईडलाइन्स योग्य असल्यानं अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार मात्र त्या UGCनं दिलेल्या तारखांना घेण्याबाबत प्रत्येक राज्यांना स्वातंत्र आहे. नवीन तारखा अथवा परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलायच्या असल्यास UGC सोबत चर्चा करून नवीन तारखा जाहीर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

कोरोनामुळे बोर्डाचे काही पेपर रद्द करण्यात आले होते. तर jee आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. मात्र JEE आणि नीट परीक्षाही ठरलेल्या तारखेनुसार होणार आहे. कोरोनामुळे रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे.



हेही वाचा

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

कोरोना संकटात झाली इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा