Advertisement

NEET-JEE परीक्षा घेण्यासाठी दबाव, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा दावा

विद्यार्थी आणि पालकांकडून सातत्याने दबाव असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे.

NEET-JEE परीक्षा घेण्यासाठी दबाव, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा दावा
SHARES

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) आणि आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (JEE Main) नियोजित वेळापत्रकानुसार ठरलेल्या तारखांनाच होतील, अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) केली आहे. यावरून सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. परीक्षा ठरल्या वेळेतच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. परंतु विद्यार्थी आणि पालकांकडून सातत्याने दबाव असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे. (hrd minister ramesh pokhriyal clarifies on JEE and NEET exams)

जेईई आणि नीट परीक्षा कधी? या परीक्षा घेण्यासाठी केंद्र सरकार कधी परवानगी देणार असे प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांकडून सतत विचारण्यात येत होते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही सरकारचं प्रधान्य आहे. मात्र अजून किती काळ अभ्यास करायचा ही चिंता विद्यार्थ्यांना भेडसावत होती. एवढंच नाही, तर जेईई परीक्षेसाठी साडे आठ लाखांहून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी म्हणजेच ८० टक्के विद्यार्थ्यांनी अ‍ॅडमिट कार्ड देखील डाउनलोड केलं आहे, अशा स्थितीत सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाजूनेच निर्णय घेण्याचं ठरवलं, असं रमेश पोखरियाल निशंक यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - NEET-JEE Main परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच

जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणं अनिवार्य असणार आहे. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून एका खोलीत केवळ निम्मेच विद्यार्थी बसतील, अशी योजना करण्यात आली आहे. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचं पालन होऊ शकेल. 

शिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याआधी प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केली जाईल. एखाद्या विद्यार्थ्याच्या शरीराचं तापमान जास्त असेल, तर त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष तयार ठेवण्यात येईल, अशी माहिती देखील रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. 

देशभरातील शाळा-काॅलेज कधी सुरू करण्यात येतील, या प्रश्नावर गृह तसंच आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या आधारे हा निर्णय घेतला जाईल असं उत्तर पोखरियाल यांनी दिलं. 

दरम्यान भारतातील विद्यार्थ्यांना कोरोना संकटात परीक्षेसाठी बसण्यची सक्ती करणं अन्यायकारक आहे. जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचं मी समर्थन करते, अशा शब्दांत स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्गने ट्विट करत केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा - सगळ्या परीक्षा पुढं ढकला, आदित्य ठाकरेंनी लिहिलं मोदींना पत्र 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा