Advertisement

सगळ्या परीक्षा पुढं ढकला, आदित्य ठाकरेंनी लिहिलं मोदींना पत्र

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून NEET आणि JEE परीक्षांसोबत इतर प्रवेश तसंच स्पर्धात्मक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आहे

सगळ्या परीक्षा पुढं ढकला, आदित्य ठाकरेंनी लिहिलं मोदींना पत्र
SHARES

सुब्रमण्यम स्वामी यांच्या पाठोपाठ शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून NEET आणि JEE परीक्षांसोबत इतर प्रवेश तसंच स्पर्धात्मक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आहे. (Postpone all academic exams Aaditya Thackeray to PM Modi)

आपल्या पत्रातून आदित्य ठाकरे यांनी कोरोना संकट काळात परीक्षा देण्यासाठी बाहेर पडल्यास विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या परीक्षा पुढे ढकला अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. त्याचसोबत यंदाचं शैक्षणिक वर्ष (२०२०-२१) हे नेहमीप्रमाणे जून/जुलै ऐवजी सुरू न करता ते जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात यावं जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असा सल्लाही आदित्य ठाकरे यांनी या पत्रातून दिला आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राची माहिती करून देताना आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विविध प्रस्तावित स्पर्धात्मक आणि प्रवेश परीक्षांच्या आयोजनामुळे देशभरातील विद्यार्थी तसंच त्यांच्या कुटुंबियांना उत्पन्न होणाऱ्या आरोग्याच्या धोक्याकडे लक्ष वेधलं आहे. तसंच यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची मागणी देखील केली आहे. 

हेही वाचा- जानेवारी ते डिसेंबर नवं शैक्षणिक वर्ष? राज्य सरकारचा विचार सुरू

आदित्य ठाकरे यांच्याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून NEET आणि JEE परीक्षांसोबतच इतर स्पर्धात्मक परीक्षा पुढे ढकल्याची मागणी केली होती. तसंच या परीक्षा दिवाळीनंतर घेता येतील, असा सल्लाही दिला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत देशभरातील तरूणांमध्ये निराशेची भावना आहे. अशा संकटकाळात त्यांच्यावर परीक्षा थोपवणं यामुळे कदाचित मोठ्या संख्येने आत्महत्या देखील होऊ शकतात, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल भलेही माझ्या सल्ल्याशी सहमत असले, तरी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेऊ शकतात. त्यामुळे मी थेट त्यांनाच पत्र लिहिलं आहे, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केलं. 

सर्वोच्च न्यायालयाने १७ आॅगस्ट रोजी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावत वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक NEET आणि आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक JEE परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील हे स्पष्ट केलं होतं.  

याच पद्धतीने युवा सेनेच्या माध्यमातून देखील कोरोना संकटाच्या पाश्वर्भूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा- वैद्यकीयच्या परीक्षांचा मार्ग मोकळा, न्यायालयाने फेटाळली स्थगितीची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा