Advertisement

वैद्यकीयच्या परीक्षांचा मार्ग मोकळा, न्यायालयाने फेटाळली स्थगितीची मागणी

परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा निर्णय रद्द करावा किंवा तूर्तास त्याला स्थगिती द्यावी, अशा विनंतीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

वैद्यकीयच्या परीक्षांचा मार्ग मोकळा, न्यायालयाने फेटाळली स्थगितीची मागणी
SHARES

कोरोना संकटाच्या काळात परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणं विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे विद्यापीठाला ऑनलाइन परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत किंवा तूर्तास परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. परंतु न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांना मोकळा रस्ता करून दिला आहे. (bombay high court refuses to stay on final year medical exams in maharashtra)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने १७ ऑगस्टपासून बीडीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा तर, २५ ऑगस्टपासून पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. परंतु मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा निर्णय रद्द करावा किंवा तूर्तास त्याला स्थगिती द्यावी, अशा विनंतीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. 

परीक्षा घेण्यास आमचा विरोध नाही. मात्र, कोरोनाच्या काळात परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणं विद्यार्थ्यांसाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे विद्यापीठाला ऑनलाइन परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी देखील विनंती करण्यात आली होती.

हेही वाचा- Medical Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप नाहीच, राज्य सरकार मांडणार बाजू

देशभरातील अभिमत विद्यापीठे व अन्य विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत, तर करिअरच्या बाबतीत त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. उच्च शिक्षण किंवा विशेष शिक्षणात त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होऊन संबंधित विद्यार्थी पदवीधर होणंही गरजेचं आहे. जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची मदत घेता येईल. त्यामुळे वैद्यकीयच्या परीक्षा होणं गरजेचं आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत, अशी बाजू विद्यापीठातर्फे मांडण्यात आली.

ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे आणि ज्यांनी परीक्षांची तयारी देखील केली आहे, अशा विद्यार्थ्यांचा विचार न करता परीक्षांना स्थगिती देणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. तुम्ही करोनाच्या भीतीमुळे परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देण्यासाठी घाबरत असाल, तर मग रुग्णालयात रुग्णांवर उपचार तरी कसे करणार‌? असा प्रश्न विचारत न्यायालयाने या परीक्षांना स्थगिती देण्यास नकार दिला. 

हेही वाचा- Medical Exams: विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नकोच- अमित देशमुख
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा