Advertisement

medical exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप नाहीच, राज्य सरकार मांडणार बाजू

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने इंटर्नशीप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र सरकारच्या या निर्णयाला केंद्रीय परिषदेने नकार दिला आहे.

medical exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप नाहीच, राज्य सरकार मांडणार बाजू
SHARES

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घेण्यात येतील तसंच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने इंटर्नशीप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र सरकारच्या या निर्णयाला केंद्रीय परिषदेने नकार दिला आहे. त्यामुळे येत्या ३१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. (maharashtra government keen to give internship for final year medical students)

यासंदर्भात अमित देशमुख पुढे म्हणाले की, राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या  विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम संपताच कालापव्यय टाळण्यासाठी इंटर्नशीप सुरू करून परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र केंद्रीय परिषदेने यास नकार दिल्याने या प्रश्नावर येत्या ३१ तारखेला होणाऱ्या अंतिम सुनावणीत भूमिका मांडताना राज्य सरकार आपली बाजू  लावून धरणार आहे.

हेही वाचा - Medical Exams: विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नकोच- अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मनस्थिती आपण समजू शकतो. यामुळे ३१ तारखेच्या अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असंही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यातील वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र सध्याची कोरोना विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा घेऊ नये. त्याऐवजी या परीक्षा अनुकूल वातावरण निर्माण होताच घेण्यात  याव्यात, अशा सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या.

प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात. अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशीप सुरू करण्यात यावी. कोविड -१९ चा  प्रादुर्भाव  कमी होताच  या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसं केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावं, असे निर्देशही अमित देशमुख यांनी दिले होते.

हेही वाचा - पदव्युत्तर वैद्यकीयच्या परीक्षा पुढं ढकला, सरकारची केंद्राकडे मागणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा