Advertisement

पदव्युत्तर वैद्यकीयच्या परीक्षा पुढं ढकला, सरकारची केंद्राकडे मागणी

विद्यर्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचं वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

पदव्युत्तर वैद्यकीयच्या परीक्षा पुढं ढकला, सरकारची केंद्राकडे मागणी
SHARES

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तर काही परीक्षा रद्द करण्यात आल्या. दरम्यान, परीक्षा पुढे ढकलल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतून शिक्षण मंडळ निर्णय घेत आहे. परंतु, असं असलं तरी अद्याप वैद्यकीय परीक्षांबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये अजून संभ्रमाचं वातावरण आहे. मात्र, अखेर गुरूवारी या परीक्षांबाबत गुरूवारी अंतिम निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यर्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षांच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यपीठानं जाहीर केलं होतं, मात्र विद्यर्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचं वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. वैद्यकीय परीक्षांबाबतची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मार्गदर्शक तत्वे व सूचना आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठ तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर त्यांना परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थी पालक यांच्यासमोरील अडचणी लक्षात घेऊन नियोजित परीक्षा पद्धती अधिक सोपी आणि सोयीची करण्याचा प्रयत्न अजूनही करण्यात येत आहे. शासनाच्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होणार असून सर्व वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही देशमुख यांनी स्पष्ट केलहे.त्र

दरवर्षीप्रमाणे २ पेपरमध्ये एक दिवसाचं अंतर ठेवण्यात यावं, याबाबत गुरूवारी शासनानं आदेश जारी केले. त्याशिवाय, पीजीरीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा प३ ते ४ महिने पुढे ढकलण्यात यावी. ज र ऊत्या परीक्षा रद्द कक्तूषणिकरून मागील ३ वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित त्यांना गुण देता येत असतील तर ते द्यावेत, असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून तो केंद्र शासनाला पाठवला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.



हेही वाचा -

Salons Open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

सामान्य प्रवाशांसाठी लोकल १२ ऑगस्टपर्यंत बंद; लांब पल्ल्यांच्या नियमित गाड्याही रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा