नव्या कुलगुरूचा शोध घेणार कस्तुरीरंगन समिती

डाॅ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून हकालपट्टी केल्यानंतर नव्या कुलगुरूच्या शोधासाठी निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या निवड समितीच्या अध्यक्षपदी डॉ. के. कस्तुरीरंगन यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूची निवड करण्यासाठी या निवड समितीची स्थापना केली.

डॉ. कस्तुरीरंगन यांनी भूषवलेली पदे

  • अध्यक्ष - भारतीय अंतराळ संशोधन संस्था 1994-2003
  • कुलगुरु - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
  • चेअरमन - कर्नाटक नाॅलेज कमिशन
  • राज्यसभा सदस्य - 2003-2009
  • अध्यक्ष- नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स स्टडी, बंगळुरू


हेही वाचा -

३० ऑक्टोबरपर्यंत भरा 'एटीकेटी'चा फॉर्म


पुढील बातमी
इतर बातम्या