Advertisement

३० ऑक्टोबरपर्यंत भरा 'एटीकेटी'चा फॉर्म


३० ऑक्टोबरपर्यंत भरा 'एटीकेटी'चा फॉर्म
SHARES

मुंबई विद्यापीठाने 'लॉ' च्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल २४ ऑक्टोबरपर्यंत लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ही तारीख उलटूनही अनेक विद्यार्थ्यांचे निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांचं विद्यापीठात आंदोलन सुरू आहे. एका बाजूला निकाल हाती नाही, तर दुसऱ्या बाजूला एटीकेटीचा फाॅर्म भरण्याची तारीखही जवळ आल्याने नेमकं करायचं काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी विद्यापीठाने एटीकेटी फॉर्म भरण्याची तारीख ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.


विद्यापीठात काय घडलं?

विद्यापीठातील महात्मा फुले भवनसमोर मंगळवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. निकाल मिळाल्याशिवाय विद्यापीठातून न हालण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक मागण्या विद्यापीठापुढे मांडल्या. त्यानुसार बुधवारी विद्यापीठाने ३० तारखेपर्यंत 'एटीकेटी'चा फॉर्म भरण्याची मुदत वाढवली.


विद्यार्थ्यांच्या मागण्या

  1. सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावे
  2. सरासरी गुण दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी 
  3. विद्यार्थ्यांच्या निकालातील चूका तात्काळ दूर कराव्यात
  4. मेरीट लिस्ट कंपनीवर कारवाई करावी 


कुलगुरूंची हकालपट्टी करणे आणि केटीच्या फॉर्मची मुदत वाढवणे अशा आमच्या दोन मागण्या विद्यापीठाने मान्य केल्या आहेत. आमच्या उर्वरीत मागण्याही लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे.

- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ काऊन्सिल


जोपर्यंत निकाल आमच्या हातात येत नाही तोपर्यंत केटीचा फॉर्म कसा भरणार? केटीच्या परीक्षेत नापास झालो तर पुन्हा निकाल पुनर्मुल्यांकनासाठी द्यावा लगणार. हे चक्र सतत सुरूच राहील. त्यामुळे जोपर्यंत निकाल आमच्या हातात येत नाही तोपर्यंत केटीचा फॉर्म भरणार नाही.

- विनायक शेडगे, लॉ विद्यार्थी



हेही वाचा-

नापास विद्यार्थी बनला 'टॉपर'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा