Advertisement

नापास विद्यार्थी बनला 'टॉपर'

ज्या विद्यार्थ्याला अनुपस्थित दाखवत विद्यापीठाने नापास केलं होतं, तो विद्यार्थी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीत चक्क 'टॉपर' झाला आहे.

नापास विद्यार्थी बनला 'टॉपर'
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराच्या अजब तऱ्हा दिवसागणिक समोर येत आहेत. ज्या विद्यार्थ्याला अनुपस्थित दाखवत विद्यापीठाने नापास केलं होतं, तो विद्यार्थी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीत चक्क 'टॉपर' झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या विद्यार्थ्याचं नाव आहे पार्श्व भंकरीया.


कसा झाला नापास?

पार्श्व मुंबई विदयापीठाशी संलग्नीत सरकारी लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे. पार्श्वला सहाव्या सेमिस्टरमध्ये विद्यापीठाने अनुपस्थित दाखवत नापास केलं होतं. पण आपण नापास होऊच शकत नाही, हा आत्मविश्वास पार्श्वला होता. त्याने उत्तरपत्रिका पुर्नतपासणीसाठी अर्ज केला. 


दिवाळीच्या एक दिवस आधी 'गिफ्ट'

उत्तरपत्रिका पुनर्तपसाणीत त्याला ७१.७५ टक्के गुण मिळाल्याचं समोर आलं. पार्श्वला सर्व विषयात 'ए' ग्रेड मिळाली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधीच पार्श्वला त्याचा निकाल कळला. हे त्याच्यासाठी सर्वात मोठं 'गिफ्ट' ठरलं. यामुळे पार्श्वचं वर्ष वाया जाणार नसून तो आता मास्टर्ससाठी अॅडमिशन घेणार आहे.


निकाल होते राखीव

ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या, अशा विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने राखीव ठेवले होते. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखावून त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता.


विद्यार्थ्यांनी केलं होतं उपोषण

'लॉ'च्या विद्यार्थ्यांचे रखडलेले निकाल लवकरात लवकर लागावेत याकरीता अमेय मालशे या विद्यार्थ्याने उपोषण केलं होतं. त्यानंतर आठवड्याभरात निकाल लागतील या विद्यापीठाने दिलेल्या अश्वासनानंतर त्याने आपलं उपोषण मागे घेतलं.  मात्र घाईघाईत लावलेल्या या निकालातही गोंधळ झालाच आणि अनेक लॉ च्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकालच मिळाले नाहीत.


मी परीक्षेला हजर असुनही विद्यापीठाने मला अनुपस्थित दाखवलं होतं. आता मी पुढील शिक्षणासाठी अर्ज करणार आहे. अनुपस्थित दाखवल्यामुळे मला शून्य मार्क देण्यात आले होते. त्यामुळे हे वर्ष वाया जाणार अशी भीती मनात कायम होती. कधी पहिला येईन, असं वाटलं नव्हतं. पण आज खूप आनंद झाला आहे. डोक्यावरचे टेन्शन कमी झालं आहे.

- पार्श्व भंकरीया, विद्यार्थी



हेही वाचा -

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ घसरले


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा