Advertisement

विद्यापीठाच्या निकालात पुन्हा घोळ!

मुंबई विद्यापीठाने सर्व निकाल जाहीर केले म्हणून विद्यार्थ्यांनी सुटकेची नि:श्वास टाकला. लॉच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले म्हणून सर्वच विद्यार्थी आनंदी होते. पण पुढच्या दोन दिवसांतच निकालाचा नवीन घोळ पुढे आला आहे.

विद्यापीठाच्या निकालात पुन्हा घोळ!
SHARES

मुंबई विद्यापीठाने सर्व निकाल जाहीर केले म्हणून  विद्यार्थ्यांनी सुटकेची नि:श्वास टाकला. लॉच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले म्हणून सर्वच विद्यार्थी आनंदी होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढच्या दोन दिवसांतच निकालाचा नवीन घोळ पुढे आला. निकाल लागले तरी अद्याप अनेक विद्यार्थ्यांना आपले निकाल दिसलेलेच नाहीत!

१७ ऑक्टोबरला विद्यापीठाने सर्व राखीव निकाल जाहीर केले आहेत. तरी अनेक विद्यार्थ्यांना निकाल मिळालेले नाहीयेत. यात एलएलबी सेमिस्टर-२, सेमिस्टर -४ च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या निकाल रखडलेल्या विद्यार्थ्यांचा नंबर आणि अभ्यासक्रमाची यादी लॉ चा विद्यार्थी अमेय मालशे या विद्यार्थ्याने विद्यापीठाचे प्रभारी परिक्षा संचालक अर्जुन घाटूळे यांच्याकडे दिली आहे.


उपोषणामुळे लागलेले निकाल

लॉ चा विद्यार्थी अमेय मालशे या विद्यार्थ्याने रखडलेल्या निकालाविरोधात उपोषण केले होते. यावेळी पुढील सहा दिवसांत सर्व निकाल जाहीर होतील, असे अश्वासन विद्यापीठाने दिले. विद्यापीठाने आश्वासन पाळले आणि घाईघाईत निकाल लावले. मात्र, पुन्हा एकदा घोळ झाला. अनेक विद्यार्थ्यांना आपले निकाल दिसतच नाहीयेत. तर अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात गुणांचा घोळ आढळला. विद्यापीठाने पाठवलेल्या गुणपत्रिकेतील गुण आणि कॉलेजकडे पाठवलेले गुण यात तफावत आहे.

चार महिने रखडेलेल्या निकालांमुळे अनेक लॉच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजची संधी गमवावी लागली. तर अनेक विद्यार्थ्यांना नोकरीसाठी चालून आलेली संधी सोडावी लागली. मात्र, चार महिन्यांनतर लागलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. निकालात झालेला घोळ बघता आम्ही पुन्हा आंदोलन करायचे का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. गरज पडली तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा अमेय मालशे या विद्यार्थ्याने दिलाय.



हेही वाचा

...तर आम्ही आत्महत्या करू!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा