Advertisement

निकाल लागले तरी, विद्यार्थ्यांवर टागंती तलवार कायम


निकाल लागले तरी, विद्यार्थ्यांवर टागंती तलवार कायम
SHARES

१९ सप्टेंबरची डेडलाईन पाळण्यासाठी विद्यापीठाने घाईघाईत का होईना, सगळे निकाल जाहीर केले. मात्र, अद्याप हजारो मुलांचे भवितव्य टांगणीलाच आहे. अलीकडे पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांची संख्या वाढतेय, तर दुसरीकडे विद्यापीठाने जवळजवळ १० हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे ते पदव्युत्तर प्रवेशाकडे!

पदव्युत्तर प्रवेशाची मुदत वाढवून दिलेली अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल लागले नसल्यामुळे तसेच या विरोधात विद्यार्थ्यांनीही कोर्टात याचिका दाखल केल्याने पदव्युतर प्रवेशाची तारीख वाढवण्यात आली होती. आता २५ तारखेपर्यंत तरी उर्वरीत विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होणार का यावर अद्यापही प्रश्नचिन्हच आहे.

२५ तारखेच्या आधी सर्व निकाल जाहीर झाले नाहीत, तर विद्यार्थ्यांना पद्वयुतर प्रवेशाची संधी गमवावी लागणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीही गमवाव्या लागणार आहेत. याआधीही अनेक विद्यार्थ्यांनी परदेशी जाण्याची संधी गमावली आहे. विद्यापीठाच्या अॉनलाईन असेसमेंटचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला आणि अजूनही बसतोय. कारण, राखीव ठेवलेल्या हजारो निकालांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवण्यात आले आहे. तर काहींना उत्तरपत्रिकेत शून्य गुण दिले आहेत.


पुनर्मूल्यांकनासाठी आलेले अर्ज आणि राखीव निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. आम्ही निकाल पद्व्युतर प्रवेशाच्या अंतिम मुदतीआधी लागावेत यासाठी प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.

- डॉ. अर्जुन घाटुळे, प्रभारी परीक्षा नियंत्रक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा