मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळं ठिकठिकाणी साचलेलं पाऊस, वाहतूक कोंडी, रेल्वे खोळंबा यामुळे अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचता आलं नाही. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालकांनी दिलासा दिला असून येत्या बुधवारी ११ जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
पावसाचा फटका
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारीही जोरदार पाऊस झाल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. या पावसाचा मोठा फटका नोकरदारवर्गासह विद्यार्थ्यांनाही बसला. मुंबईची तुंबई झाल्यानं मंगळवारी अकरावी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना पोहोचता आलं नाही. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाईल अशी भिती वाटत होती, परंतु या विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालकांनी दिलासा दिला असून येत्या ११ जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई शहर व उपनगरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं रेल्वेसह इतर इतर वाहतूकही विस्कळीत झाली होती. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचता आलं नसल्यानं या विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली.
- राजेंद्र अहिरे, शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग
हेही वाचा -
तृतीय वर्ष बी. कॉम.चा निकाल जाहीर
अहो, आश्चर्यम्! तावडे म्हणतात, ''मुंबईत अतिवृष्टी नाही''