अकरावीच्या पाचव्या विशेष फेरीची यादी जाहीर

पहिल्या चार याद्यांमध्ये प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या विशेष यादीत प्रवेश देण्यात येईल, असे उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार यादी १६ अॉगस्टला सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आली. यादी जाहीर होताच विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अकरावीच्या अभ्यासक्रमाला महाविद्यालयांत सुरूवात होऊनही अजून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकलेला नाही. त्यामुळे या यादीकडे विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष होते.

कुणाला मिळणार प्रवेश?

दहावी परीक्षेनंतर १० जुलैला अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना १० महाविद्यालयांचा पसंतीक्रम अर्जात द्यायचा होता. प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, अकरावी प्रवेशाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य होते. मात्र १० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाच नाही. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊनही रद्द केले. अशा विद्यार्थ्यांना पाचव्या विशेष यादीत प्रवेश दिला जाणार आहे.

अशी होती पाचव्या विशेष फेरीची प्रक्रिया

  • १० ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता रिक्त जागांची माहिती
  • ११ ते १३ ऑगस्ट ऑनलाईन अर्ज भरणे
  • १६ ऑगस्ट गुणवत्ता यादी जाहीर करणे

१६ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीसाठी १९,३३६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला होता. त्यापैकी १६,२५३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना या पाचव्या विशेष फेरीत प्रवेश मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी १८ आणि १९ ऑगस्टला महाविद्यालयात जाऊन आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत, असे उपसंचालक कार्यालयातून सांगण्यात आले आहे.


हे देखील वाचा -

ऐतिहासिक! कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या