अकरावी प्रवेशासाठी ११ ऑगस्टपासून विशेष फेरी

  Mumbai
  अकरावी प्रवेशासाठी ११ ऑगस्टपासून विशेष फेरी
  मुंबई  -  

  अकरावी प्रवेशाच्या चार याद्या लागल्या. मात्र अजूनही ३० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी ११ ऑगस्टपासून विशेष फेरी राबवण्यात येणार आहे.


  या अंतर्गत ज्या महाविद्यालयांत रिक्त जागा आहेत, अशा महाविद्यालयांची माहिती जाहीर करण्यात येईल. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.

  अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नव्हता. असे विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या आधीच्या तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश घेऊन नंतर प्रवेश रद्द केला आहे, अशा विद्यार्थ्यांनाही या फेरीत स्थान मिळणार आहे.

  यानंतरही काही विद्यार्थी शिल्लक राहिल्यास दुसरी फेरी घेण्यात येईल, असे उपसंचालक कार्यालयातून सांगण्यात आले आहे.


  चौथी फेरीसाठी दिली होती मुदतवाढ

  अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेच्या चौथ्या फेरीला १० ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.

  चौथ्या फेरीत ९ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार होता. मात्र मराठा क्रांती मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील महाविद्यालय बंद असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली होती.


  अशी असेल विशेष फेरी

  १० ऑगस्ट, सायंकाळी ५ वाजता - रिक्त जागांची माहिती जाहीर करणार
  ११ ते १३ ऑगस्ट - ऑनलाईन अर्ज भरणे
  १६ ऑगस्ट - गुणवत्ता यादी जाहीर करणे
  १८, १९ ऑगस्ट - महाविद्यालयांत प्रवेश घेणे  हे देखील वाचा -

  डॉ. संजय देशमुख सक्तीच्या रजेवर, राज्यपालांची नाराजी भोवली  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.