'या' वेबसाईट्स वर 'असा' पहा १० वीचा निकाल

२९ जुलै म्हणजेच बुधवारी महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल लागणार आहे. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे १० वीचा निकाल देखील एक महिना उशीरा लागला आहे. 

२०२० मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यी बसले होते. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी परिक्षेत बसल्या होत्या.

उद्या जाहीर होणाऱ्या दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाईन कसा बघाल? याचीच माहितीआम्ही देत आहोत. खाली दिल्यानुसार कराल तर निकाल पाहणं सोपं जाईल.

‘इथं’ पहा निकाल

हेही वाचा : Fyjc Admission ११वी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून

कसा पाहायचा निकाल? 

  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
  • त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचं नाव अनघा असेल, 
  • त्यानंतर तुमच्या पहिल्या बॉक्समध्ये M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच ANA असं लिहावं लागेल.
  • यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल.
  • निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

एसएमएसवर निकाल

बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766 वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल.


हेही वाचा

महाराष्ट्र बोर्डाचा १० वीचा निकाल उद्या होणार जाहीर

९वी, ११वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

पुढील बातमी
इतर बातम्या