Advertisement

९वी, ११वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ७ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष शाळेत बोलावून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे घेण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

९वी, ११वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी यंदा शाळा व कॉलेज बंद करण्याच निर्णय घेण्यात आले. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकालाबाबत प्रश्न उपस्थित झाला. परंतु, या प्रश्नातून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी यासाठी शालेय शिक्षण मंडळानं अनेक निर्णय घेतले. त्यानुसार, इयत्ता १०वी व १२वीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यातच आता यंदा ९वी आणि ११वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शक्य नाही. दरम्यान, या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून आणखी एक संधी शिक्षण विभागानं दिली आहे.

या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ७ ऑगस्ट २०२० पर्यंत प्रत्यक्ष शाळेत बोलावून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे घेण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानंतर, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यंदाच्या १०वी व १२वीच्या वर्गात प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्या. ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना यंदा सत्राच्या गुणांच्या सरासरीवरून उत्तीर्ण करावं, असा निर्णय शिक्षण विभागानं घेतला.

हेही वाचा - 'या' कारणास्तव विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नका, शासनाचे शैक्षणिक संस्थांना आदेश

९वी व ११वीचे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचं समोर आलं. त्यातच २०१८ या शैक्षणिक वर्षाप्रमाणे होणारी फेरपरीक्षा ही यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक पालकांसह शिक्षक संघटनांनी याचा निषेध करत विद्यार्थ्यांना सरसकट पास करून १०वी व १२वीच्या वर्गात पाठविण्याची विनंती वारंवार केली. काही पालकांनी ९वी व ११वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबत निर्णय घ्यावा, यासाठी ऑनलाइन आंदोलनही केले.

पदवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सोबतच विद्यार्थी सुरक्षाही महत्त्वाची आहे. ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. शिक्षक संघटनांसह पालकांनी ही मागणी सातत्यानं लावून धरल्यामुळं, तसंच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून शिक्षण विभागाकडून ७ ऑगस्टपर्यंत शाळांना विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे.



हेही वाचा -

Mumbai Rains मागील २४ तासांत शून्य पावसाची नोंद

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा