Advertisement

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

गणपती मंडळांचे अर्ज येणार त्यांनाच यावर्षी परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेला आतापर्यंत केवळ १५० अर्ज आले आहेत.

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज
SHARES

मुंबईवर कोरोनाव्हायरसचं सावट आहे. त्यात २२ ऑगस्टपासून गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. पण यंदा गणेवशोत्सवात कोरोना विघ्न आहे. त्यामुळे यावर्षी अगदी साधेपणानं आणि काही नियमावलीचं पालन करत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

पालिकेच्या नियमानुसार, ज्या गणपती मंडळांचे अर्ज येणार त्यांनाच यावर्षी परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेला आतापर्यंत केवळ १५० अर्ज आले आहेत. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लोकांना गणेश चतुर्थी उत्सव साधेपणानं साजरा करण्याची परवानगी दिली आहे.

दरवर्षी सरासरी ३ हजार ते ४ हजार अर्ज यायचे. पण त्या तुलनेत यावर्षी केवळ १५० अर्ज आले आहेत. ही संख्या प्रचंड कमी आहे. गेल्या वर्षी ज्या मंडळांना परवनागी दिली गेली नव्हती त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, हे देखील पालिका अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : Ganeshotsav: मूर्ती विसर्जनासाठी महापालिका बांधणार कृत्रिम तलाव

यंदा गणपतीची मूर्ती ४ फुटापेक्षा अधिक नसावी, असे आदेश देखील पालिकेकडून देण्यात आले आहेत. नियमांनुसार, पंडाळांमध्ये ४ फूटपेक्षा जास्त आणि घरात २ फूटपेक्षा जास्त मूर्ती स्थापित केली जाऊ शकत नाही. याव्यतिरिक्त, महानगरपालिकेनं मंडळांना देखील कोरोनाचे नियम लागू करण्यास सांगितलं आहे.

पालिकेनं लागू केलेल्या नियमानुसार, पंडाळ आणि मंडळांना सोशल डिस्टनसिंगचं पालन करावं लागेल. प्रत्येकानं मास्क घालणं बंधनकारक आहे. तसंच, फुले किंवा हार अशा अर्पणांवर बंदी घातली जाईल. दिवसातून तीन वेळा पंडाल स्वच्छ करणं बंधनकारक असेल. एकाचवेळी फक्त पाच सदस्यांना एकाच पंडलमध्ये राहण्याची मुभा दिली आहे.

शहरातील सर्वात लोकप्रिय गणेश मंडळांपैकी एक, 'लालबागचा राजा' (लालबागचा राजा) गणेशोत्सव मंडळानं यावर्षी उत्सव पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी रक्तदान, प्लाझ्मा दान शिबिरासह जनजागृती शिबिरं राबवली जाणार आहे.

मुंबईत COVID 19 च्या साथीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनानं सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णयही घेतला आहे. पण प्रशासनानं लोकांना पुढे येऊन रक्त किंवा प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरुन इतर रुग्ण बरे होऊ शकतील.



हेही वाचा

सरकारच्या नियम, अटीचं पालन करत मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार : किशोरी पेडणेकर

कोरोनामुळं अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतला 'हा' निर्णय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा