Advertisement

Ganeshotsav: मूर्ती विसर्जनासाठी महापालिका बांधणार कृत्रिम तलाव

गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी दक्षिण मुंबईत पाच कृत्रिम तलाव बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Ganeshotsav:  मूर्ती विसर्जनासाठी महापालिका बांधणार कृत्रिम तलाव
SHARES

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबई महापालिकेला शहरात आणखी कृत्रिम तलाव बांधण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईत सध्या गणपती विसर्जनासाठी ३४ कृत्रिम तलाव आहेत. मात्र, आणखी तलावांची आवश्यकता असल्याचं समन्वय समितीने म्हटलं आहे.  

गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी दक्षिण मुंबईत पाच कृत्रिम तलाव बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कृत्रिम तलावाची यादी बृहन्मुंबई सार्वजनुक गणेशोत्सव समन्वय समितीने जाहीर केली आहे.  

या ठिकाणी तलाव  

- ऑगस्ट क्रांती मैदान, ऑगस्ट क्रांती मार्ग

- वसंतदादा पाटील उद्यान (ट्रॅफिक आयलँड), साने गुरुजी मार्ग, ताडदेव

- एस.एम. जोशी क्रीडांगण, डोंगरशी मार्ग, मलबार हिल

- ग्लाइडर लेन, कर्मचारी वसाहत, डॉ. डी.बी. मार्ग  

- आंग्रेवाडी, व्हीपी रोड, गिरगाव


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच श्रीगणेशाच्या मूर्तीही ४ फुटापर्यंत असावी, गणेशोत्सवाच्या काळात कुणीही कुठेही गर्दी करु नये असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 



हेही वाचा -

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा