Advertisement

Mumbai Rains मागील २४ तासांत शून्य पावसाची नोंद

मागील २४ तासांत मुंबईत सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेत ०.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Rains मागील २४ तासांत शून्य पावसाची नोंद
SHARES

मुंबईत पावसानं चांगलीच विश्रांती घेतली आहे. मागील आठवड्याच्या विकेंडला दमदार हजेरी लावत पावसानं मुंबईकरांना दिलासा दिला होता. परंतु, सोमवारपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मागील २४ तासांत मुंबईत सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेत ०.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईत जास्तीचा पाऊस झाला तर, झाड पडणं, इमारतीचा भाग कोसळणं, संरक्षक भिंत पडणं अशा घटना घडतात. परंतु, पाऊस न पडता सुद्धा मुंबईत अशा घटना घडल्या आहेत. 

मुंबईत ७ ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार, २ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. परळ येथील पेरू चाळीमध्ये छताचा भाग कोसळून एक महिला किरकोळ जखमी झाली. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. मनस्वी चिल्ले असे या महिलेचे नाव आहे. ४ ठिकाणी झाडे कोसळली. एका ठिकाणी शॉर्ट सर्किटची घटना घडली. 

सुदैवाने उर्वरित घटनांत कोणीही जखमी झालेले नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. मुंबईत कित्येक दिवसांनी कडाक्याचे ऊन पडले होते. हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण नाही. २६ जुलैच्या आसपास हवामानात मान्सूनसाठी पोषक बदल होतील. त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

सिविकअरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा