IIT- Bombay ला विक्रमी २६ कोटी रुपयांची देणगी

पवई इथल्या IIT-Bombay ला विक्रमी २६ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. अमेरिकेत ‘आयआयटी बॉम्बे हेरिटेज फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केली आहे. तिच्या माध्यमातून देणगी जमा करण्यात आली आहे.

या फाऊंडेशननं १ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ३.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच २६ कोटी १९ लाख रुपये देणगी जमा केली. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा ७३ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १५.४२ कोटी रुपये देणगी जमा झाली होती.

संस्थेसाठी ५ कोटी रुपये देणगी संस्थेतील ‘हॉस्टेल 5’मध्ये वास्तव्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांनीही जमा केली आहे. नुकताच मुंबई आयआयटीचा ६२वा स्थापना दिन सोहळा पार पडला. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली. संस्थेला गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांचा तुटवडा भासत असल्यामुळे माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली ही देणगी दिलासा देणारी आहे.


हेही वाचा

नवी मुंबईत १० अनधिकृत शाळा, 'ही' आहे यादी

बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार

पुढील बातमी
इतर बातम्या