Advertisement

नवी मुंबईत १० अनधिकृत शाळा, 'ही' आहे यादी

या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत असं आवाहन नवी मुंबई महापालिकेने केलं आहे.

नवी मुंबईत १० अनधिकृत शाळा, 'ही' आहे यादी
SHARES

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० प्राथमिक शाळा अनधिकृत सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. शासनाची आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता या अनधिकृत शाळा सुरू आहेत. या शाळांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. ह्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत असं आवाहन आता नवी मुंबई महापालिकेने केलं आहे. 

आर.टी.ई. अधिनियम २०००९ मधील कलम १८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी, असं नवी मुंबई महापालिकेने सांगितलं आहे. 

ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असं आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.

 अनधिकृत शाळांची यादी

१) अल मोमिना स्कुल, सेक्टर-8बी, आर्टिस्ट व्हिलेज, सी.बी.डी. बेलापूर

२) इकरा इंटरनॅशनल स्कुल, सेक्टर-27, नेरूळ

३) द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल (CBSE), सीवुड, सेक्टर-40, नेरूळ.

४) नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कुल, तुर्भेस्टोअर्स

५) रोज बड्स स्कुल, तुर्भेस्टोअर्स, नवी मुंबई.

६) सरस्वती विद्यानिकेतन स्कुल, सेक्‌टर-5, घणसोली

७) अचिएवर्स वर्ल्ड प्रायमरी स्कुल, सेक्टर-1, घणसोली

८) इम्पाईसीस इंग्रजी स्कुल, सेक्टर-2, घणसोली.

९) ब्लोसोम स्कुल, घणसोली गांव, नवी मुंबई.

१०) इलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकर नगर, रबाले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा