छबिलदास शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

दादरच्या छबिलदास सीबीएसई शाळेत मंगळवारी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्मी ऑफिसर फ्लेचर पटेल यांना आमंत्रीत करण्यात आलं होतं. पटेल यांनी विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाचं महत्त्व समजावत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 

विद्यार्थ्यांचं गुणदर्शन

यावेळी स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व काय, तो का साजरा करतात, तिरंग्याचं महत्त्व काय या विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांचं निरसनही शाळेतल्या शिक्षकांनी करून दिलं. त्याशिवाय या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषण, वेशभूषा, समूहगीत सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. तसंच पालकांनीही मोठ्या हौशेने सर्वच लहान मुलांना सफेद सदरा- लेहंगा व तिरंग्याची ओढणी घालून शाळेत पाठवलं होतं. शाळेचं वातावरण देशप्रेमामुळं भारावून गेलं होतं.

लहान विद्यार्थ्यांना सकाळी उठवून शाळेसाठी तयार करणं, तसंच त्यांना शाळेत ने-अाण करण्यासाठी पालकांची होणारी दमछाक या कारणास्तव १५ ऑगस्टऐवजी एक दिवस आधीच हा कार्यक्रम शाळेत साजरा केला जातो. या कार्यक्रमासाठी दरवर्षी शाळेत एका प्रमुख अतिथीला आमांत्रित करण्याची प्रथा आहे. यंदा विद्यार्थ्यांनीही परेड व इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहानं भाग घेतला.

- तन्वी त्रिवेदी, शिक्षिका


हेही वाचा -

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

आयडॉलचा कोणताही अभ्यासक्रम रद्द नाही- यूजीसी


पुढील बातमी
इतर बातम्या