Advertisement

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ३१ ऑगस्टपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा
SHARES

दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल उशीरा जाहीर होतात. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असूनही व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेता येत नाही. परंतु, आता या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबतची महत्त्वपूर्ण घोषणा केली.


सर्वोच्च न्यायालयात याचिका

दरवर्षी राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षेत अऩुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी राज्य शासनातर्फे लगेचच फेरपरीक्षा घेण्यात येते. जुलै महिन्यात होणाऱ्या या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटी लागतो. त्यामुळं या विद्यार्थ्यांना बँकिंग, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, फॅशन डिझाइनिंग, फोटोग्राफी अादी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येत नाही. या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात संधी मिळावी यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश

या याचिकेमध्ये फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत मिळावी अशी विनंती राज्य सरकारनं न्यायलयाला केली होती. सर्वाेच्च न्यायालयानं राज्य शासनाची ही विनंती मान्य केली असून फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ३१ ऑगस्टपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.हेही वाचा -

आयडॉलचा कोणताही अभ्यासक्रम रद्द नाही- यूजीसी 

संबंधित विषय
Advertisement